Tuesday 24 September 2013

कशाला हवी आहे महानगरपालिका?

गहुंजे : पिंपरी - चिंचवड महापालिकेत गहुंजे गावाच्या संभाव्य समावेशाबाबत आयोजित विशेष ग्रामसभेत विद्यमान पदाधिकारी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. मूलभूत सोई-सुविधा पुरविण्यासाठी पंचायत सक्षम आहे .महापालिकेत सोळा वर्षांपूर्वी शेजारच्या किवळे व मामुर्र्डीचा समावेश होऊनही अपेक्षित विकास साधण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे गहुंजे गावाचा समावेश करून महापालिका काय विकास साधणार, गावपण टिकणार का, आरक्षण पडल्याने शेतीचे काय होणार, असे विविध प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करून महापालिकेत समावेश करण्यास विरोध केला . 

No comments:

Post a Comment