Friday 20 September 2013

आळंदीकरांकडून ‘स्थायी’चा निषेध

पिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे संजीवन समाधिस्थळ असलेले आळंदी हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान आहे. वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक पंढरी असलेल्या या आळंदीला देवाची आळंदी संबोधले जाते. त्या आळंदीबद्दल चोरांची आळंदी असे अनुद्गार महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी काढले. त्यामुळे आळंदी नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत येऊन स्थायी समिती पदाधिकारी, सदस्यांचा निषेध नोंदवला. माफी मागावी, अशी मागणीही केली. 

No comments:

Post a Comment