Saturday 9 November 2013

एसटी दरवाढीबद्दल प्रवाशांत नाराजी

नेहरूनगर : एसटी भाड्यात आजपासून अडीच टक्क्यांनी प्रवास महाग झाला असून, प्रत्येक ६ किलोमीटरच्या टप्प्यासाठी १५ पैशांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. दरवाढीबद्दल सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील वल्लभनगर एसटी स्टॅन्डमधून दररोज १७५ बसगाड्या महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांत तालुक्यात व विविध खेडेगावात जातात. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणमध्ये रत्नागिरी, चिपळून, देवरुक, महाड, खेड, दापोली, मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, नगर, कळंब तसेच विदर्भात मलकापूर, जळगाव, बुलढाणा, धुळे, मालेगाव, इत्यादी भागात जातात.

No comments:

Post a Comment