Sunday 12 January 2014

चौक देताहेत अपघाताला निमंत्रण

हिंजवडी : सिग्नल, सूचना फलकांची वानवा असल्याने वाहनांच्या वेगाला ‘ब्रेक’ अशक्य 

वाकड : आयटीचा झगमगाट, अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार त्यामुळे आयटीतील रस्त्यावर जिकडे-तिकडे सुसाट धावणार्‍या अलिशान कार दिसतात. मात्र, येथील बहुतेक चौकात अपघात रोखण्याच्या काहीच उपाय योजना अथवा दिशादर्शक सूचनांचे फलक दर्शविण्यात आले नसल्याने ते चौक धोकादायक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 
वाकड पुलाकडून हिंजवडीकडे जाताना भुजबळ वस्ती चौकात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहने अपघातग्रस्त होतात.तर पुलाच्या खाली लावलेल्या बॅरिकेड्स वाकवून जीव धोक्यात घालून ऐन महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न अनेक दुचाकीस्वार करतात. इथून पुढे जावून शिवाजी चौकातून डाव्याबाजूच्या माण रोडला असणारे फेज १ विप्रो सर्कल सर्वात धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. या आयटी परिसरातील सर्वात जुन्या आणि मोठय़ा असलेल्या या चौकाजवळ तारांकित हॉटेल, पोलीस स्टेशन, अन् कंपन्या असल्याने प्रचंड वर्दळ असते. त्या मानाने येथे कुठल्याही प्रकारच्या सूचना यंत्रणा अथवा सिग्नल नसल्याने येथील अपघातांची संख्या मोठी आहे. आजवर येथे १0 जणांना प्राण गमवावे लागले आहेत

No comments:

Post a Comment