Saturday 22 February 2014

पोलिसांची वाढली ‘साखर’..

पिंपरी : परिमंडळ तीनमधील एकूण पोलीस कर्मचार्‍यांपैकी तब्बल ७५ टक्के पोलीस कर्मचारी व अधिकारी शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीमधून ही बाब समोर आली आहे. राज्य शासनाने पोलिसांसाठी २00६ पासून २५0 रुपयांचा फिटनेस भत्ता सुरू केला आहे. परंतु, निश्‍चित नसलेले ड्युटीचे तास, खाण्यापिण्याच्या अनिश्‍चित वेळा, कामाचा ताण यामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.
पोलीस खात्यात भरती होताना उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. ज्यांची शारीरिक क्षमता चांगली, त्यांनाच खात्यामध्ये प्रवेश मिळतो. 

No comments:

Post a Comment