Saturday 15 March 2014

मनपा कर्मचार्‍यांनी केला ‘लिंगाणा’ सर

पिंपरी : लिंगाणा सुळका जवळपास १000 फुटांचा भेदक सुळका म्हटले की लिंगान्याचे रौद्र रूप समोर येते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील हजार फूट उंच असलेला लिंगाणा सुळका पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचार्‍यांनी सर केला.
पुणे जिल्ह्यातून ‘बोराट्याची नाळ’ आणि ‘सिंगापूरची नाळ’ या जुन्या घाटवाटा लिंगाण्याच्या कुशीतून कोकणात उतरतात. त्यासाठी ‘वेल्हा’ तालुक्यातल्या ‘मोहरी’ या गावी जावे लागते. मोहरीतून रायलिंग पठार गाठलं की लिंगाण्याचे दर्शन घडते. या बाजूला लिंगाण्याची चढाई करावी लागते. चढाई करण्यासाठी १८ जणांचे पथक या गावी पोहोचली. मोहिमेचा नेता अनिल वाघ (फायरमन), उपनेता गौतम इंगवले (फायरमन), संदीप केंजळे, महेंद्र शिंदे, राजेश राऊत, गिरीश कुलकर्णी, ईशा कुलकर्णी, शिवकुमार काकडे, स्नेहल शिंगारे, प्रमीत नाईक यांचा त्यात समावेश होता. समवेत अभिषेक वाघ, ओम काकडे, साक्षी जाधव, आदिती डोंगरे हे बालचमूही होते.

No comments:

Post a Comment