Monday 14 April 2014

स्पर्धा भरवायच्या कशा?

पिंपरी : महापालिकेने मैदाने, हॉल, स्टेडिअम, स्केटिंग रिंक, जलतरण तलाव, व्यायामशाळा, कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत आदी क्रीडा सुविधांमध्ये भरमसाट वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वर्गातील खेळाडूंना सराव करणे, तसेच स्पर्धा आयोजन करणे अधिक कठीण झाले आहे. स्पर्धांची संख्या घटल्याने खेळाडू निर्मितीस लगाम बसण्याची शक्यता असल्याची भीती शहरातील विविध क्रीडा संघटनांनी व्यक्त केली. सरावावर र्मयादा येणार के. ए. कांबळे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड जलतरण संघटना) : जलतरणाकडे अनेकांचा कल वाढत आहे. मोठय़ा प्रमाणात एकदम दरवाढ केल्याने सरावास र्मयादा पडणार असल्याने खेळाडू तयार करणे अवघड होणार आहे. यासंदर्भात चर्चा करुन पालिकेस निवेदन देण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment