Tuesday 20 May 2014

महापालिकेकडून सोमवारपासून प्राण्यांचे मोफत लसीकरण

पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पशूसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 21 मे या कालावधीत महापालिका हद्दीतील गाई, म्हैस आणि बैल यांना लाळ्या आणि खुरकूत मोफत लसीकरण केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे म्हणाले की, लाळ्या व खुरकुत या संसर्गजन्य रोगामुळे जनावरांच्या तोंडामध्ये आणि खुरामध्ये व्रण उद्‌भवतात. जनावराच्या तोंडावाटे लाळ वाहते. त्यामुळे जनावरांना चारा खाताना त्रास होतो. खुरामध्ये फोड येतात. खुरामध्ये व्रण झाल्याने जंतूंचे प्राबल्य वाढते आणि संसर्ग होऊन जनावरांच्या हालचाली अतिशय मंदावतात. त्यांना चालणे वेदनादायक होते.

No comments:

Post a Comment