Friday 9 May 2014

एसटीच्या 'ट्रॅक'ची आरटीओच्या ...

पुणे व पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'कडून अवजड वाहनांसाठी एस. टी. महामंडळाच्या भोसरी येथील संगणकीय ट्रॅकवरील चाचणी सक्तीची केली आहे. एसटीच्या चालकांचे कौशल्य तपासण्यासाठीच्या या ट्रॅकवर खासगी चालकांना थेट 'प्रॅक्टीकल' करावे लागत आहे. ट्रक, टेम्पो, ट्रेलरचा परवाना घ्यायचा असला तरीही एसटी बस चालवून दाखवावी लागते. ही बस कधी बंद पडेल याचाही नेम नाही. त्यामुळे ही चाचणी शिकाऊ वाहनचालकांसाठी दिव्य ठरत आहे. याबाबत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी याविरोधात परिवहन आयुक्तांकडे दाद मागितली होती. या मार्गाची पाहणी केल्यानंतर इतर चालकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका फ्लेक्स, व चित्रफित बनविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment