Sunday 2 March 2014

वैद्यकीय परवाना शुल्काच्या ...

कारखाने व उद्योगधंद्यांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालये, दवाखान्यांनाही वैद्यकीय परवाना शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील विविध डॉक्टर्स संघटनांचा त्याला तीव्र विरोध असून याविरोधात उद्या (शुक्रवारी) लाक्षणिक बंदची हाक दिली आहे.
शहरातील विविध पाच डॉक्टर्स संघटनांची चिंचवड येथील फरांदे रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.   इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) शहराध्यक्ष डॉ. दिलीप कामत, इंडियन डेन्टल असोसिएशनचे (आयडीए) डॉ. अभिजीत फरांदे, पीसीडीएचे डॉ. रवी कुलकर्णी, निमाचे डॉ. सुहास जाधव, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. संदीप लुणावत आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.        

No comments:

Post a Comment