Friday 25 April 2014

बेडौल, थकलेले, म्हातारे जीवरक्षक

पिंपरी : सुटलेले पोट, बेडौल अशी शरीरयष्टी.. काही पावलांचे अंतर चालत येण्यासाठी ज्यांना दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागेल, असे वयस्कर कर्मचारी महापालिकेच्या तरण तलावांच्या ठिकाणी दिसून येतात. अशा शरीरयष्टीचे जीवरक्षक एखाद्या बुडणार्‍या व्यक्तीचा जीव कसा वाचवतील? असा प्रश्न त्या ठिकाणी भेट देणार्‍याला पडल्याशिवाय रहात नाही. चिंचवड येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे तरण तलावांच्या व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महापालिकेने त्वरित सुधारणा घडवून आणाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment