Thursday 15 May 2014

पिंपरी-चिंचवडकरांना सैर करण्यासाठी नवीन १२ उद्याने

शहरातील उद्यानांची संख्या पोहचणार 169 वर 
वैशिष्ट्यपूर्ण उद्यानांच्या उभारणीमुळे नावलौकीक प्राप्त होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नवीन 12 उद्यानांची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची संख्या 169 वर पोहचणार आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलोमीटर आहे. शहराला 'मॉडेल सिटी' म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. एकीकडे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर सारख्या प्रकल्पांमधून शहराचा नियोजनबध्द पध्दतीने विकास साधण्याचा महापालिकेचा कयास असताना दुसरीकडे शहर हरीत रहावे याकडेही महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने 350 एकर जागेवर तब्बल छोटी-मोठी 157 उद्याने विकसित केली आहेत. भोसरी सहल केंद्र, पिंपळेगुरव येथील डायनासोर उद्यान, सांगवीतील शिवसृष्टी उद्यान, कासारवाडीतील संगीत कारंजे असलेले उद्यान यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण उद्याने महापालिकेने उभारली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच विदेशातील उद्यानांचा अभ्यास देखील त्यासाठी केला आहे.

No comments:

Post a Comment