Saturday 5 December 2015

डिजिटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये बोलताना म्हणाले होते की, पूर्वी शहरे नदीच्या किनारी वसली, त्यानंतर जिथे "हाय-वे‘ म्हणजेच चांगल्या दळणवळणाच्या सोयी उपलब्ध तिथे शहरीकरण वाढले. परंतु यापुढील काळात जिथे "आय-वे‘ म्हणजेच Information Way उपलब्ध असेल तिथेच शहरे वसली जातील. यामधून आपल्याला बोध मिळतो तो म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्त्व. अन्न-वस्त्र-निवारा या जरी प्राथमिक गरजा असल्या तरी शहरांसाठी इंटरनेट सेवा बहुदा प्राथमिक गरज बनत चालली आहे. भारत सरकारने "डिजटल इंडिया‘ उपक्रमाद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सरकार आगामी काळात काय उपाययोजना करणार आहे याबद्दल आराखडा मांडला. केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांबद्दल इथे माहिती उपलब्ध आहे http://www.digitalindia.gov.in/ 

No comments:

Post a Comment