Friday, 22 July 2016

शेतकरी आठवडा बाजार @ पिंपरी-चिंचवड

आपल्या सर्वांना ज्ञात आहे कि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चुकीची अडत पद्धत व दलालांची साखळी बंद करणे व शेतकऱ्यांना त्यांचा माल शहरात थेट ग्राहकांना विकता येणे. जबाबदार नागरिक या नात्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत व सध्या सुरू असलेल्या संपाचा नागरिकांना त्रास होऊ नये या उदात्त हेतून PCCF, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एकत्र येऊन शहरभर शेतकरी आठवडा बाजाराचे आयोजन करत आहेत. शहरात खालील ठिकाणी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात येते, आपणास आव्हाहन - जरूर या आठवडा बाजारांना भेट द्यावी.

1. पिंपळे-सौदागर: यशदा चौक
2. रावेत, निगडी-प्राधिकरण: सेक्टर नंबर २९ 
3. वाकड, डांगे चौक: ओलॅरीश हॉस्पिटलसमोर
4. चिंचवड: तानाजीनगर
5. चिंचवड: प्रभाग क्रमांक २६, काळभोरनगर 
6. काळेवाडी: मोरया गोसावी स्टेडियम 
7. निगडी: कै. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, यमुनांनगर 
8. निगडी: सावरकर भवन, सेक्टर २५ 
9. निगडी: सावली हॉटेलसमोर, निगडी टिळक चौक
10. निगडी-प्राधिकरण: स्विमिंगपूल शेजारी, आकुर्डी स्टेशनजवळ 

No comments:

Post a Comment