PCMC Blog

[In this blog you will find Pimpri Chinchwad's news published in various popular Marathi/English/Hindi news paper. Due to unbiased nature of this blog ultimately citizen will get full coverage of city affairs.]

हा न्यूज ब्लॉग कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना या ईमेलवर नक्की पाठवा PimpriChinchwad.CF@gmail.com

Sunday, 25 December 2016

पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहराचे महत्व व वेगळेपण अधोरेखित!

देर आये दुरुस्त आये!! M Venkaiah Naidu said Pimpri Chinchwad will be allowed for Smart City Mission next level competition केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडवर अन्याय झाला हे मान्य केले, झालेली चूक सुधारण्यासाठी शहराला स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी केले जाईल असे आजच्या भाषणात सांगितले ...यामागे राजकीय तळमळ, दूरदृष्टी, गणिते, लाभ काहीही असो समाधान याचेच वाटतंय आज पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहराचे महत्व व वेगळेपण अधोरेखित होत आहे... पीसीसीएफ, connecting ngo व असंख्य सजग नागरिक ज्यांनी हा लढा सतत तेवत ठेवला त्यांचे आभार 🙏 आशा करूयात निगडीपासून मेट्रो मागणी सुद्धा लवकरच मान्य होईल
यात एकच भीती आहे कि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी-चिंचवडकरांना आमिषे दाखवली जात नाहीयेत ना? स्मार्ट सिटी प्रवेशाबद्दल जे काही सांगण्यात आले त्याचा सरकारी अध्यादेश शहरी विकास खाते तसेच स्मार्ट सिटी वेबसाईटवर लवकरच अपलोड झाला पाहिजे. तसेच मेट्रोचे पिंपरी ते निगडी काम पहिला टप्पा सुरु असतानाच केले जाईल यावरही आमची भूमिका अशीच असेल कि यासाठीच वाढीव खर्चाची मान्यता, सरकारी अध्यादेश काढावेत आणि मगच घोषणा करावी...

No comments:

Post a Comment