Thursday 6 April 2017

नियम न पाळणाऱ्या पिंपरीतील गृहसंस्थांची नोंदणी होणार रद्द

पिंपरी - लेखापरीक्षण न करणे, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणाऱ्या शहरातील ३३९ सहकारी गृहरचना संस्थांना सहकार खात्याकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, या सोसायट्यांकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. सहकार खात्याकडून घेण्यात आलेल्या सुनावणीला सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थितही राहिले नाहीत. त्यामुळे या सोसायट्यांना अंतरिम अवसायानाची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित संस्थांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांची नोंदणी रद्द होणार असल्याचे सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

No comments:

Post a Comment