Monday 12 June 2017

महाविद्यालयात यंदा रंगणार का निवडणूकीचा फड ?

महाविद्यालयांच्या प्रशासनाला अजूनही निवडणूक अधिसूचनेची प्रतिक्षा 
पुणे, दि. 11 (प्रतिनिधी)- नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी निवडणुका घेणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापर्यंत राज्य शासनाने विद्यार्थी निवडणुकीची अधिसूचनाच प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थी निवडणुका होणार का, असा प्रश्‍न होत आहे. अद्याप निवडणुकीची नियमावली नसल्याने या विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे चिन्हे आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यात विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रथमच विद्यार्थी निवडणूकांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून अधिसभा, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद किंवा इतर समित्यांवर विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना राजकारणात आवड आहे, त्यांना व्यासपीठ मिळण्याची संधी आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ निवडणूका लढवण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.

No comments:

Post a Comment