Wednesday 19 July 2017

शैक्षणिक साहित्यांचे विद्यार्थ्यांना वेळेत वाटप; शिक्षणाधिकारी आवारी यांची माहिती

पिंपरी- महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांतील साहित्यांचे 85 टक्के वाटप पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरित साहित्य 30 ऑगस्टपर्यंत पुर्ण देणार आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी बी.एस.आवारी यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येते. यामध्ये गणवेश, पी. टी. गणवेश, वह्या, बूट सॉक्‍स, रेनकोट, दप्तर, स्वेटर, कंपासपेटी व फुटपेटी, नकाशावही, चित्रकला वही, अभ्यासपुरक पुस्तके यासह अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. महापालिका शाळा 15 जूनला सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले.

No comments:

Post a Comment