Saturday 8 July 2017

थेरगाव परिसरात दूषित पाणी पुरवठा

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून थेरगाव परिसरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा होईपर्यंत महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
थेरगाव परिसरात पवारनगर, मंगलनगर, गणेशनगर, वाकडरोड, रत्नदीप कॉलनी, गुजरनगर या परिसरात कमी दाबाने व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून, अनेक नागरिक व लहान मुलांना मळमळ होणे, उलट्या-जुलाबाचा त्रास होत आहे. नाईलाजास्तव अनेक नागरिक खासगी टॅंकर मागवत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत या परिसराला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment