Tuesday 25 July 2017

फ्री वायफायसाठी वैयक्‍तिक माहिती देऊ नका…

भारतात मोठ्या प्रमाणात फ्री वायफाय वापरायला मिळत नाही. त्यामुळे कुठे फ्री वायफाय मिळत असेल तर 73 टक्‍के भारतीय वैयक्‍तिक माहिती द्यायलाही तयार असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी नॉर्टनने हे संशोधन केलं आहे. सेवा निवडताना फ्री वायफाय हा देखील एक मोठा मुद्दा बनला आहे. जिथे फ्री वायफाय असेल, त्याच सेवेला लोक जास्तीत जास्त पसंती देतात, असं या संशोधनात म्हटलं आहे.
हॉटेल निवडताना 82 टक्‍के, परिवहन सेवा निवडताना 67 टक्‍के, विमान सेवा निवडताना 64 टक्‍के, 62 टक्‍के लोक रेस्टॉरंट निवडताना तिथे फ्री वायफाय आहे की नाही, याची पडताळणी करतात आणि त्यानंतरच पर्याय निवडतात.

No comments:

Post a Comment