Monday 31 July 2017

वापर नसलेल्या स्वच्छतागृहांचे होणार सर्व्हेक्षण

महापालिकेचा निर्णय : दुरुस्तीचे काम हाती घेणार
पिंपरी – शहरातील नादुरूस्त व वापरात नसलेली स्वच्छतागृहे शोधण्यासाठी समग्र संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी संयुक्तरित्या पडझड झालेली सार्वजनिक स्वच्छतागृह शोधून त्यांच्या दुरूस्तीचा अहवाल तयार करणार आहेत. दुरूस्तीनंतर करून सर्व स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर वापरात आणली जाणार आहेत, अशी माहिती स्वच्छ भारत अभियान विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment