Sunday 6 August 2017

प्रवाशांच्या तक्रारींची 24 तासांत दखल; पीएमपी व्यवस्थापनाचा दावा

पुणे : बसगाड्यांची दुरवस्था, वेळापत्रकानुसार बसगाड्या उपलब्ध नसणे, थांब्यावर बस न थांबविणे, चालक-वाहकांचे गैरवर्तन, बसगाड्यांची संख्या वाढविणे अशा स्वरूपाच्या सरासरी शंभर तक्रारी दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) प्रवाशांनी केल्याचे 'पीएमपी'कडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या सर्व तक्रारींची 24 तासांत दखल घेऊन त्या सोडविल्या जात असून, त्याचा परिणाम 'पीएमपी'ची सेवा सुधारण्यास होत असल्याचा दावा 'पीएमपी' व्यवस्थापनाने शनिवारी केला. 

No comments:

Post a Comment