Thursday 31 August 2017

स्वच्छतेच्या गुणवत्तेसाठी महापालिकेचा स्वतंत्र आराखडा

चौफेर न्यूज –  केंद्र सरकारची स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम 4 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे. या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. यामध्ये 1 सप्टेंबरपासून दर शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या कालावधीत दोन तासाचे श्रमदान करून वॉर्ड व परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहे. दर पंधरा दिवसांनी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment