Saturday 26 August 2017

'स्वारगेट'सारखा न्याय 'निगडी'ला मिळणार का?

ट्रान्सपोर्ट हबचे महत्व मुख्यमंत्र्यांनी ओळखले म्हणूनच 5 वर्षांपूर्वी स्वारगेट येथील जेधे चौकाच्या मंजूर प्रकल्पाचे आता नव्याने नियोजन केले जाणार... निगडी येथेही ट्रान्सपोर्ट हबचीनितांत गरज आहे. भक्ती-शक्ती चौकात सध्या PCMC, PCNTDA, State Transport, PMPML, MahaMetro यांचे वेगवेगळे नियोजन चालले आहे यातून वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो जटिल होईल नाहक वेळ व पैसा वाया जाईल. भक्ती-शक्ती चौकाचा पुढील 30 वर्षांचा विचार करून सक्षम यंत्रणेला 'मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब'चा मास्टर प्लॅन बनवण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी द्यावा हि पिंपरी-चिंचवड शहरातील जाणकार नागरिकांची मागणी आहे. 

2 comments:

  1. निगडी परिसर हा प्राधिकारणामुळे आधीच फारसा प्रगत झाला आहे.. पुरेशा सर्व सोयी निगडी परिसरात आधीच आहेत.. माझे वैयक्तिक मत असे आहे की मेट्रो , ट्रान्सपोर्ट हब सारख्या सोयी वाढल्यावर परिसराची अवास्तव गर्दी वाढून घाणच होणार आहे... आज पिंपळेसौदागर चा परिसर, जगताप डेअरी चौक सारखा प्रगत मृत्यूचा सापळा होण्यापेक्षा आहे तसा बरा म्हणायला हरकत नाही. या मुळे राजकारण करू पाहणाऱ्या पुढारी लोकांवर सुद्धा वचक राहील. निगडीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असून हा निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांचा उद्देश न समाजण्याजोगा बिलकुल नाही... दुसऱ्या टप्प्यात वाढीव खर्च मंजूर करून आपले खिसे भरू पाहणाऱ्या ह्या पुढाऱ्यांना वाव का द्यावा?

    ReplyDelete
  2. Metro will help areas to get decongest also elder citizen can get comfortable transport option. Though their are pros and cons but benefits at this moment are outnumbered - MH14 News Team

    ReplyDelete