Monday, 21 August 2017

[Video] पवना धरण ओव्हर फ्लो; धरणाचे सर्व दरवाजे उघडले


एमपीसी न्यूज - काल रात्रीपासून पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे दुपारी पवना धरणाचे सहा दरवाजे उघडून त्यातून 3 हजार 636 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे पवना नदी अगोदरच दुथडी भरून वाहत आहे. त्यातच धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment