Tuesday, 19 September 2017

प्रशासनाकडे विकासकामांचा “दुष्काळ’?

नागरिकांचा सवालः हाच का सत्ताधाऱ्यांचा अजेंडा!
पिंपरी, (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पहिल्या सहा महिन्यातच पिंपरी-चिंचवड समस्यांचे आगार बनले आहे. विकासाचा वेग मंदावला आहे. नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. कचरा, साफसफाई, ड्रेनेज, रस्ते, खड्डे, पाणी आदी सुविधांमधील अनियमिततेचा नागरिकांना त्रास होत आहे. हे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना वैद्यकीय विभागाच्या पदोन्नतीसारख्या विषयांत कमालीचा रस दिसत आहे. लोकांचे प्रश्‍न चर्चेअंती सोडविण्याचे व्यासपीठ असलेल्या सर्वसाधारण सभेतील अजेंड्यावरही विषयांचा “दुष्काळ’ पडला आहे. यावरून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन यांच्यातील उदासिनता दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment