Wednesday 11 October 2017

महागड्या वीजेमुळे राज्यातील वीजग्राहक हैराण

इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीज महाग ; अतिरिक्त आकारांतूनही ” भार" पुणे – राज्यातील ग्राहक भारनियमनाला सामोरे जात असतानाच मिळणारी वीज देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाग मिळत असून ग्राहकांना इतर राज्यांच्या तुलनेत प्रतियुनिट तब्बल दोन ते अडीच रुपये जादा मोजावे लागत आहेत. या ग्राहकांवर अतिरिक्त आकारांच्या माध्यमातून अतिरिक्त भार टाकला जात आहे. यामुळे त्यांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. एकप्रकारे महावितरण राज्यभरातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना चक्क ” टोपी’ घालत असल्याचे चित्र यामुळे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांवर हा भार कशासाठी असा सवाल सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

No comments:

Post a Comment