Thursday 5 October 2017

दैनंदिन प्रवासाचा पास वाहकांकडेच मिळणार

पुणे - पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाचा ७० रुपयांचा पास गुरुवारपासून (ता. ५) फक्त बसमध्येच वाहकाकडे (कंडक्‍टर) मिळणार आहे. त्यामुळे स्थानकावरील पास केंद्रात दैनिक पास मिळणार नसल्याचे पीएमपीने बुधवारी जाहीर केले. 
प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने प्रवाशांसाठी ७० रुपयांचा दैनिक पास सुरू केला आहे. हा पास सध्या बस स्थानकांवर पास केंद्रातही मिळतो. मात्र हा पास आता पीएमपी बसमध्ये वाहकाकडे मिळणार आहे. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील कोणत्याही मार्गावरील बसमध्ये हा प्रवासी पास उपलब्ध होणार आहे. त्याची प्रवाशांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा ४० रुपयांचा पास बस स्थानकावर पास केंद्र आणि बसमध्ये वाहकाकडेही मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment