Saturday 4 November 2017

महावितरणकडून ग्राहकांना ठेंगाच

अनागोंदी कारभार : खासदार बारणेंच्या सूचनांनाही वटाण्याच्या अक्षता
पिंपरी, (प्रतिनिधी)- सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त तर आहेतच, परंतु आता घरगुती ग्राहकदेखील महावितरणच्या कारभारामुळे जेरीस आले आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी पाहता खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसांपूर्वीच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत खासदार आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या होत्या की नागरिकांना त्रास होता कामा नये. परंतु या सूचनांचा उलटा परिणाम शहरात पहावयास मिळत आहे. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशीपासून शहरातील वेगवेगळ्या रोज किमान एकदा तरी वीज पुरवठा खंडित होत आहे.

No comments:

Post a Comment