Sunday 26 November 2017

डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावेही लिहून देणे बंधनकारक

मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.  ब्रॅन्डेड औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना संबंधीत कंपन्यांची औषधं लिहून देण्यासाठी एमआरमार्फत अनेक प्रलोभनं मिळत असतात. त्यामुळे डॉक्टर्स जाणिवपूर्वक जेनेरिक औषधांची नावं रुग्णांना लिहून देण्यास टाळाटाळ करतात. पण यापुढे डॉक्टरांना असं करता येणार नाही.

No comments:

Post a Comment