Monday 6 November 2017

ताथवडेतील शाळा हस्तांतराचा मार्ग मोकळा; संदीप पवार यांच्या प्रयत्नांना यश

गेल्या आठ वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या ताथवडे येथील शाळेचा वनवास अखेर संपला आहे. शाळेच्या महापालिका हस्तांतराला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे. 
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये २००९ साली ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची गरज होती. तत्कालीन नगरसेविका यमुनाताई पवार यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, शाळेतून बदली झालेल्या काही शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली असून, राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.

No comments:

Post a Comment