Saturday 18 November 2017

दुरूस्तीची काढलेली कामे म्हणजे कामांचा दिखावा?

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरात सत्तातरानंतर पहिल्यांदाच पालिकेने प्रत्येक कामात सल्लागार नियुक्त करून सर्व सामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी सुरू असुन ती थांबविण्यात यावी, याबाबत महापालिका आयुक्तांकडे माजी स्थायी अध़्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहराचा सन २००२ ते २०१७ पर्यंतच्या काळातील विकास पाहता पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील वेगाने विकसित झालेली महापालिका आहे. २०१७ च्या सत्तांतरानंतर गेल्या काही महिन्यांपासुन सत्ताधारी व प्रशासन कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमुन सर्वसामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करत आहे? विशेष म्हणजे सन २०१७ पुर्वी सल्लागारांना तिव्र विरोध करणारे आत्ता सत्ताधारी झाल्यावर सल्लागारांना स्वागत कक्ष उभारून बसले आहेत. अनेक,रस्त्यांच्या कामाला दुरूस्तीची गरज नसताना सल्लागारांमार्फत कामे काढुन कामांचा दिखावा कशासाठी?अनेक कामांचा क्रॉस सेक्शन काँमन असताना असतानाही सल्लागारांची नेमणुक कशासाठी, यात महापालिकेचे अधिकारी निष्क्रिय झाले आहेत का? कामावर तुमचे नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी या  निवेदनात विचारले आहेत.यात विविध चुकींच्या कामाचे दाखले त्यांनी निवेदनात दिले आहेत.

No comments:

Post a Comment