Tuesday, 14 November 2017

बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या रद्द करा

चौफेर न्यूज –  महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment