Sunday 8 October 2017

‘पीएमआरडीए’च्या नियोजनासाठी सिंगापूरच्या कंपनीची मदत घेणार

मुख्यमंत्र्यांची माहिती : सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार
प्रभात वृत्तसेवा
पुणे – ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) नियोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी “सुर्बना ज्युरॉन्ग’ या सरकारी कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून “पीएमआरडीए’चे नियोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे राज्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. राज्य सरकारच्या अजेंड्यावर पुण्याचा समावेश आहे. महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीला सुरूवात झाली आहे. आता पुणे महानगराचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान “सुर्बना ज्युरॉन्ग’ या जगप्रसिद्ध कंपनीशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment