Friday 13 October 2017

देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातवे वेतन

चौफेर न्यूज – केंद्र सरकारने बुधवारी देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिवाळी भेट दिली आहे. या प्राध्यापकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ते दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जानेवारी २०१६ पासून प्राध्यापकांसाठी सातवा वेतन लागू करण्यात आल्याचे सांगितले. देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ३२९ राज्य विद्यापीठे आणि १२१९२ महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.

No comments:

Post a Comment