Tuesday 28 November 2017

संतपीठाचा “डीपीआर’ लांबणीवर; प्रशासनाला मिळेना वेळ, अभ्यास दौरा होवूनही अहवालाची प्रतिक्षा

चिखली येथे महापालिकेच्या वतीने राज्यातील पहिले जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारले जाणार आहे. या संतपीठाचा विकास आराखडा व त्यातील आवश्‍यक सोयी-सुविधा, संत साहित्य, वाडःमयाची रचना आदी माहिती मिळविण्यासाठी महापालिका पदाधिकारी, समिती सदस्य, अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा पुर्ण केला आहे. मात्र, त्या दौऱ्याचा अहवाल अद्याप प्रशासनाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर न केल्याने संतपीठाचा आराखड्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

No comments:

Post a Comment