Thursday 30 November 2017

पीसीईटीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पेटंट नोंदणीसाठी अर्ज

चौफेर न्यूज –  वर्ग सुरु असताना बाहेरील पॅसेजमधील साफ सफाईचे काम करताना स्लिपरच्या आवाजामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा. साबण, ॲसिड, फिनाईल मिश्रीत पाण्यामुळे सफाई कर्मचारी अनेकदा पाय घसरुन पडले. त्यातून छोट्या मोठ्या दुखापती झाल्या. यावर काय तरी उपाय शोधला पाहिजे. या हेतूने प्रा. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी सुनिता कांबळे आणि सहका-यांनी स्लिपर चप्पलवर अनेक प्रयोग करुन बहुउपयोगी स्लिपरचे डिझाईन तयार केले. यासाठी प्रा. राहुल बावणे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment