Monday 8 January 2018

नदी वाचवा, समाज संस्कृती वाचेल – आयुक्त श्रावण हर्डीकर

आज मोठ्या प्रमाणात नद्यांवर अतिक्रमणे केली जात आहेत. खरे तर नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. जिवंत नद्या या जिवंत जगाचे द्योतक आहेत. त्यामुळे नद्यांचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नदी वाचली तर समाज संस्कृती वाचेल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड येथे आज व्यक्त केले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून चिंचवडगाव येथे आज (रविवारी) नदी संवर्धन व स्वच्छता याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हर्डीकर बोलत होते. 

No comments:

Post a Comment