Tuesday 9 January 2018

भोसरीत शुक्रवार पासून ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावर व्याख्यान

जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या घाईत लोटतात, हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्‌गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ५१ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

No comments:

Post a Comment