Friday 2 February 2018

उद्योगांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

  • पिंपरी चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमने व्यक्‍त केली नाराजी
पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभेत प्रस्तुत होण्यापूर्वीपर्यंत निवडणुकीपूर्वीचे संपूर्ण बजेट अशा शब्दांमध्ये चर्चेत असलेल्या अर्थसंकल्पाने पटलावर आल्यावर मात्र उद्योगनगरीच्या उद्योजकांची निराशा केली. औद्योगिक क्षेत्रात नैराश्‍य आणणारा अर्थसंकल्प अशा शब्दात पिंपरी चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम या पाच औद्योगिक संघटनांच्या फोरमने अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. काही उद्योजकांनी या अर्थसंकल्पावर निराशा व्यक्‍त केली तर काहींनी दूरगामी विकासाला महत्त्व देणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment