Wednesday 7 February 2018

राजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे

पिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.’’ राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना ठामपणे दाखवली पाहिजे.

No comments:

Post a Comment