Monday, 30 April 2018

यमुनानगर जलतरण तलावाची अवस्था बिकट

तलावायन भाग – 10
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण तलावांपैकी निगडीतील यमुनानगर येथील मिनाताई ठाकरे जलतरण तलावाची सर्वाधिक दूरवस्था झाली आहे. या तलावातील फरश्‍या फुटल्या असून बाजुचे कड्डपे तुटले आहेत. जलतरण तलावाची स्वच्छता न केल्याने तळात शेवाळ साचले आहे. तसेच तलाव परिसरात व कार्यालयातील विद्युत व्यवस्थेचीही बोंब झाली आहे. तलावातील स्टीलच्या शिड्या तुटल्या असून स्वच्छतागृहातील शॉवरचीही तोडफोड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment