Tuesday 29 May 2018

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारी सायकल वारी अन अनोखी फोटोग्राफी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पूर्वीपासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. ही ओळख अलीकडच्या काळात काही प्रमाणात कमी होत आहे. कारण शहरात औद्योगिक विकासासह, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पुणे शहराला 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट', 'शिक्षणाचे माहेरघर' अशा अनेक नावांनी ओळखले जाते. तर पिंपरी-चिंचवड शहराला 'औद्योगिक नगरी' म्हणून नावाजले जाते. शहरात अनेक शैक्षणिक संकुले देखील गजबजली आहेत. दिमाखात चालणारी सांस्कृतिक सभागृहे ही शहराचा सांस्कृतिक विकासच सांगत आहेत. पण हा विकास किंवा नव्याने तयार होणारी शहराची ओळख कोणत्यातरी माध्यमातून जगापुढे मांडण्याची आवश्यकता असते. चिंचवड मधील दोन तरुणांनी शहराची ओळख जगापुढे मांडण्याची नवी शक्कल लढवली आहे. दररोज सकाळी सायकलिंग करून दर दिवशी शहरातील एका प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा सपाटा त्यांनी महिनाभर केला आहे.

​Pimpri : पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारी सायकल वारी अन अनोखी फोटोग्राफी

No comments:

Post a Comment