Thursday, 17 May 2018

पाणी उधळपट्टीवर “वॉच’!

जललेखा परीक्षण होणार : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय
पिंपरी – निर्धारित मापदंडापेक्षा अधिक पाणी महापालिका पवना धरणातून उचलत आहे, असा आरोप वारंवार होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाण्याचा वारेमाप उपसा करुन उधळपट्टी सुरु आहे. त्यामुळे उपसा केलेल्या पाण्याची नासाडी तर होत नाही ना? याकरिता राज्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाकडून महापालिकेच्या पाणी वापराचे जललेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाण्याचे “ऑडिट’ येत्या जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले जाणार आहे. शहरातील अधिक पाणी वापरावर निर्बंध घातले जाण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment