Friday 25 May 2018

वाकडमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयावर ​परिसंवाद कार्यशाळा

तुम्हाला हे माहित आहे का? पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर जेवढे पाणी लागते त्याच्या 35 ते 40 टक्के पाण्याचा पुरवठा हा भूगर्भातून होतो... शहरातील लहान-मोठ्या कंपन्या, सोसायट्या ह्यांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते तसेच टँकरने होणारा पाणीपुरवठा हा सुद्धा बोअरवेलचाच असतो असे असले तरी पाण्याचा अतिप्रमाणात उपसा झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट होतेय. भविष्यातील संकट ओळखून आपल्याला वेळीच उपाय केले पाहिजे. उपाय म्हणजे जसे आपण भूगर्भातून पाणी काढतो तसे भूगर्भात जास्तीतजास्त पाणी जिरवणे. याच विषयावर - 'भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्यजल संचयन (Rainwater Harvesting)' वाकडमध्ये दिनांक 27 मे, रविवार रोजी परिसंवाद कार्यशाळा आयोजित केली आहे.

विख्यात तज्ञ हिमांशु कुलकर्णी व शशिकांत देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे... तेव्हा कृपया हि संधी दवडू नये
-------------------------------------------
जाहीर निमंत्रण परिसंवाद
विषय : भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जल संचयन
रविवार दिनांक 27 मे 2018 सकाळी 10 ते 12:30
स्थळ : सभागृह, रोहन तरंग को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, वाकड चौक, वाकड, पिंपरी-चिंचवड
अधिक माहिती - https://www.facebook.com/events/361918100968914/

No comments:

Post a Comment