Tuesday 22 May 2018

शहरात डास निर्मूलन मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या संख्येने तक्रारीत वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शहरात डास निर्मूलन मोहीम  राबविण्यात येणार आहे.हा निर्णय पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात सोमवारी (दि.21) झाली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, एसटी वर्कशॉपचे आधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. डासांमुळे मलेरिया, डेंगी व चिकुनगुनिया हे आजार होतात. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील नागरिक त्रस्त आहेत. डास निर्मुलनाबाबत मुंबई महापालिकेने राबलिल्या अभियानाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका अभियान राबविणार आहे.

No comments:

Post a Comment