Friday 29 June 2018

‘होर्डिंग्ज’बाबत प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार

नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील कृष्णा चौक,काटेपुरम चौक, जिजामाता उद्यान, सृष्टी चौक, पिंपळे गुरव रस्त्यावरची ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’बाजीची गर्दी  दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ताथवडे आणि आळंदी रस्त्यावरील अधिकृत ‘होर्डिंग्ज’ अंगावर पडल्यामुळे अलीकडेच एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा “होर्डिंग्ज’पायी  नागरिकांचे किती बळी जाणार आहे, हा कळीचा प्रश्‍न उद्भवत आहे.  तर; दुसरिकडेे वाढत्या ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’मुळे शहरी भागाच्या सौंदर्याला बाधा येत आहे.  त्यामुळे आकाश चिन्ह विभागातील प्रशासनाचा मूक कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment