Saturday 9 June 2018

जागेचा मालकी हक्क नसताना पिंपरी महापालिकेकडून बिल्डरला बांधकाम परवानगी

पिंपरी -चिंचवड महापालिकेचा सर्वाधिक बदनाम असलेला नगररचना विभाग स्थानिक शेतकऱ्यांना वेड्यात काढून बिल्डरांच्यासाठी कशा प्रकारे पायघड्या घालते, याचे एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. मुंबईतील एका बिल्डरला वाकडमध्ये गृहप्रकल्प उभारण्यासाठी कागदपत्रांच्या आधारे एका सर्व्हे क्रमांकावर परवानगी दिली. प्रत्यक्षात हे बांधकाम दुसऱ्याच सर्व्हे क्रमांकावर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद सुरू असताना नगररचना विभागाने बांधकामांसाठी एफएसआय देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा दाखल केलेले शेतकरी महेश भुजबळ यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment