Friday 27 July 2018

केवळ एक खड्डा बुजविण्यास ‘जेट पॅचर’चा खर्च बाराशे रूपये; पावसाळ्यातील 4 महिन्यांसाठी 2 कोटी 80 लाख पालिकेचा खर्च

पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने जेट पॅचर मशिन ठेकेदारी तत्वावर घेतले आहे. एक चौरस मीटरचा खड्डा बुजविण्यासाठी 1 हजार 200 रूपये दर आहे. केवळ 4 महिन्यांच्या कामासाठी तब्बल 2 कोटी 80 लाखांचे बिल अदा केले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या खड्डे दुरूस्तीसाठी ही यंत्रणा उपयुक्‍त नाही. हे काम ठेकेदारांसाठी कुरण ठरत असून, भरमसाट खर्च करूनही शहरातील खड्डे दुरूस्त होत नसल्याचे विरोधक दावा करीत आहेत.

No comments:

Post a Comment