Thursday 5 July 2018

‘जागते रहो’ रात्रग्रस्त उपक्रमाची झाली सांगता

चिंचवड ठाण्यातर्फे पोलीस मित्रांचा सत्कार
चिंचवडः प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्यावतीने ‘जागते रहो’ हा रात्रगस्त उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या 16 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरफोड्या रोखण्यासाठी समितीच्यावतीने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत उपक्रम राबविला गेला. 7 मे ते 30 जूनच्या काळामध्ये निगडी प्राधिकरण, चिंचवड परिसरामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात घरफोड्या रोखण्यात यश आले. पुणे शहर पोलीस परिमंडळ तीनमधील चिंचवड पोलीस ठाण्याच्यावतीने 22 पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्र देण्यात आले. विशाल शेवाळे, अमोल कानू, नितीन मांडवे, अजय घाडी, तेजस सापरिया, बाबासाहेब घाळी, मोहन भोळे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, संतोष चव्हाण, अमित डांगे, अमृत महाजनी, मनोज ढाके, सतीश मांडवे, अश्‍विन काळे, राजेश बाबर, समीर चिले, रेखा भोळे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे या कार्यकर्त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांनी सत्कार केला.

No comments:

Post a Comment